शहाबाज सार्वजनिक वाचनालयास संगणक भेट

शहाबाज सार्वजनिक वाचनालयास संगणक भेट
Published on

शहाबाज सार्वजनिक वाचनालयास संगणक भेट

पोयनाड, ता. १ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय या संस्थेस संगणक भेट देण्यात आला आहे. माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम संचालित विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उतेखोल येथे या संगणक वाटपाचा कार्यक्रम आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांबरोबर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय यांना संगणक भेट देण्यात आले.
निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून उत्तर व दक्षिण रायगड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संगणक, प्रिंटर आणि प्रोजेक्टर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयास एक नवीन संगणक भेट देण्यात आला आहे. शहाबाज वाचनालयास मिळालेला संगणक ही अभिमानाची बाब असल्याचे वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा संगणक स्वीकारण्यासाठी शहाबाज येथील सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाचे प्रवीण पाटील, प्रशांत पिंगळे, मंगेश भगत आदी उपस्थित होते.

छायाचित्र :
पोयनाड : माणगाव येथे शहाबाज सार्वजनिक वाचनालयास संगणक भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com