माहेरवाशीण कार्यक्रमासह पाट्या वाटप उपक्रम उत्साहात
आजी-आजोबांच्या शाळेत पाट्यांचे वाटप
डोंबिवलीच्या ‘हिरकणी’चा पालघरमध्ये आगळावेगळा उपक्रम
डोंबिवली, ता. २३ ः सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देणाऱ्या डोंबिवलीतील ‘हिरकणी महिला सायकल क्लब’ने सामाजिक बांधिलकी जपत पालघरमधील कामतपाडा येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवला. ‘माहेरवाशीण’ कार्यक्रमासह येथील आजी-आजोबांच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थ्यांना पाट्यांचे वाटप करून या महिलांनी मायेची ऊब दिली.
‘सुनंदा - एक माणुसकीची भिंत’ या संस्थेचे अध्यक्ष गुडेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी उपस्थित माहेरवाशीण महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. सहभागी महिलांचा साडी-चोळी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी आजी-आजोबांच्या शाळेला भेट देऊन तेथे अक्षर ओळख करून घेणाऱ्या सुमारे ६५ वयोवृद्धांना पाट्यांचे वाटप केले. या वेळी वृद्धत्वाकडे झुकलेल्या आजींनी सादर केलेले पारंपारिक ‘तारपा नृत्य’ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. हिरकणी क्लबच्या सदस्यांनी या ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्याशी स्नेहाचे नाते अधिक दृढ केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रवीना म्हात्रे, गणेश गोवेकर (छावा ब्रिगेड) आणि सुनीता जैन यांचे विशेष योगदान लाभले. तसेच संस्थापक सरोज उतेकर, सचिव मनीषा सुर्वे, सुरेखा माळी आणि समृद्धी राणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
आरोग्यासोबत सामाजिक भान
गेल्या चार वर्षांपासून हिरकणी महिला सायकल क्लब केवळ महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठीही कार्यरत आहे. अशा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचे क्लबतर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

