ताडगोळे १५० रुपये डझन

ताडगोळे १५० रुपये डझन

Published on

ताडगोळे १५० रुपये डझन
कासा, चारोटी परिसरात खरेदीसाठी गर्दी
कासा, ता.२३ (बातमीदार)ः कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांचा कल शीतपेयांकडे वळला आहे. लिंबूपाणी, उसाचा रस, सरबतांसोबतच सध्या बाजारात दाखल झालेल्या रसरशीत ताडगोळ्यांना मागणी असल्याने डझनाला १५० रुपये भाव मिळत आहे.
डहाणू, बोर्डी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची आवक बाजारात होते. रस्त्यालगत अनेक विक्रेते ताडगोळ्यांची विक्री करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी ताडगोळे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांकडून त्यांना विशेष पसंती मिळत आहे. पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला थंडावाबरोबरच खनिजे, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस तसेच अ, ब आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यातील ताडगोळे अधिक लोकप्रिय फळ ठरत आहेत.
--------------------
तोडणीसाठी खर्च
ताडगोळ्यांच्या किंमतीत यंदा वाढ झाली आहे. उंच ताडाच्या झाडावर चढून ताडगोळे उतरविण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टाची, धोकादायक असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. यामुळे तोडणीचा खर्च वाढला असून त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. सध्या बाजारात डझनमागे सुमारे १५० रुपये भाव आकारला जात असून गेल्या वर्षी हा भाव १२० रुपये असल्याचे विक्रेते विनायक बसवत यांनी सांगितले.
------------------------
महालक्ष्मी यात्रेमुळे मागणीत वाढ
आगामी महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ताडगोळ्यांच्या विक्री वाढली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपूल परिसरात अनेक विक्रेते ताडगोळे विकताना दिसत असून आजूबाजूच्या गावांतील विक्रेतेही यात्रेसाठी तयारी करत आहेत. मुंबई, ठाणे तसेच गुजरातमधून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची खरेदी करत असल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com