लेकीकडून वडिलांना शब्दांतील अभिवादन :
लेकीकडून वडिलांना शब्दांतील अभिवादन
‘लेक उवाच’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : वडील आणि लेक यांच्यातील नाते हे शब्दांच्या पलीकडचे, भावनांनी विणलेले असते. या नात्याची हळवी, जिव्हाळ्याची आणि मनाला स्पर्श करणारी कहाणी आता पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार स्व. शशिकांत कोनकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारं ‘लेक उवाच’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
उमा चांदे यांनी आपल्या वडिलांविषयीच्या आठवणींना शब्दबद्ध करत हे पुस्तक लिहिले आहे. साधेपणा, माणुसकी, कुटुंबासाठीची निष्ठा आणि निःस्वार्थ प्रेम यांचा ठसा उमटवणाऱ्या कोनकर यांच्या आयुष्याचे संवेदनशील चित्रण या पुस्तकातून उलगडते. एका लेकीच्या नजरेतून पाहिलेले वडिलांचे व्यक्तिमत्त्व वाचकांना भावनिक प्रवास घडवतो. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. २९) सायंकाळी ४:३० वाजता ठाणे (पश्चिम) येथील नामदेववाडी सभागृहात होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण दवणे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन राजीव पाटणकर करणार आहेत. या प्रसंगी साहित्यप्रेमी, मान्यवर, कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

