ठाणे-भिवंडी मार्गावर दोन अपघात

ठाणे-भिवंडी मार्गावर दोन अपघात

Published on

ठाणे-भिवंडी मार्गावर दोन अपघात
दुचाकीस्वारासह रिक्षाचालक जखमी, कारचालक फरार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे-भिवंडी मार्गावर रविवारी (ता. २२) दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघातांत दुचाकीस्वार व रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, एका प्रकरणात टेम्पोचालकाविरुद्ध तर दुसऱ्या प्रकरणात अनोळखी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
घोडबंडर रोड-पातलीपाडा येथील निशित रामजीयानी (२७) हा भिवंडीच्या दिशेने दुचाकीने जात असताना रुस्तमजी टॉवरसमोरील मुख्य रस्त्यावर अपघात झाला. ठाण्याकडून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अचानक राँग साईडने आलेल्या टेम्पोचालकाने दुभाजक ओलांडून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रामजीयानी हे मोटारसायकलसह खाली पडल्याने जखमी झाले. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील सलीम कुरेशी (३८) हे रिक्षा चालवत कापूरबावडी नाका येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना कशेळी पुलाजवळ पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी होऊन कुरेशी हे रिक्षाखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. या अपघातात कुरेशी यांना गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर संबंधित कारचालक पसार झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांमुळे ठाणे-भिवंडी मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com