खालापुरात तीन अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
खालापुरात तीन अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
खालापूर, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील तीन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन, तर खंडाळा घाटात एक अपघात घडला.
खालापूर तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. पहिला अपघात रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास मौजे रिस गावाजवळ मुंबई-पुणे मार्गावर झाला. भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकरचालक जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी टँकरचालकाविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा अपघात खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे घडला. पुण्याकडे जाणारा भरधाव आयशर टेम्पो सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फूड मॉलजवळ पोहोचला असता, पुढील कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला. चालक सोहेल खान (वय ३२, उत्तर प्रदेश) केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि देवदूत पथक घटनास्थळी दाखल झाले. केबिनचा भाग कटरने कापून सोहेल खान याला बाहेर काढण्यात आले; मात्र तो गंभीर जखमी असल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाट उतरताना अंडा पॉइंटजवळ सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडला. पुण्याहून मुंबईकडे फळांची वाहतूक करणारा छोटा टेम्पो अनियंत्रित होऊन रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

