४१ ग्रामपंचायतींच्या २८ एप्रिलला पोटनिवडणुका
४१ ग्रामपंचायतींमध्ये २८ एप्रिलला पोटनिवडणुका
शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमधील एकूण ६१ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून, २९ एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे.
३५ ग्रामपंचायतींतील ५५ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये कलभोंडे, आपटे, मुगाव, उंबरखांड, लवले, पिवळी, जांभूळवाड, वांद्रे खोर, नांदवळ, पाषाणे, गेगाव, वेहलोळी (बु.), मोखावणे, शेलवली, धसई, फुगाळे, कानवे, टेंभरे, शिरगाव, चिखलगाव, बिरवाडी, ठुणे, कसारा (खु.), भातसई, कळमगाव, अघई, बाभळे, विहिगाव, अस्नोली, शेंद्रुण, वेहलोळी (खु.), साठगाव, खर्डी आणि खातिवली यांचा समावेश आहे.
तसेच निरर्हता, मृत्यू, अविश्वास ठराव किंवा नामनिर्देशनपत्र न मिळाल्यामुळे रिक्त झालेल्या किन्हवली, आवाळे, आटगाव, सानेपाली, मढ-हाल आणि लवले या सहा ग्रामपंचायतींतील थेट सरपंचपदाच्या जागांसाठीही याच दिवशी निवडणुका होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

