केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट

केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट

Published on

केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट
पाणी देयक वसुलीत १५३ कोटींची तूट

डोंबिवली, ता. २३ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाणी देयक वसुलीत मोठा आर्थिक फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात अपेक्षित असलेल्या २०२ कोटी रुपयांच्या महसुलापैकी केवळ ५० कोटी रुपयेच पालिकेच्या पदरात पडले आहेत. तब्बल १५३ कोटींची ही तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले असून, वसुली यंत्रणेतील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याने अधिकृत पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण येत आहे. शहरात एक लाख ६७ हजार अधिकृत जोडण्या असताना, बेकायदा बांधकामांची संख्या दोन लाख ३५ हजारांच्या घरात आहे. मुख्य जलवाहिन्यांना छिद्रे पाडून केल्या जाणाऱ्या चोरीमुळे शहरात सुमारे २५ ते ३० टक्के पाणी महसूल न देताच वापरले जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे होणारी पाणीगळती २३ टक्क्यांवर पोहोचली असून, याचा दुहेरी फटका महसुलाला बसत आहे.

विभागांमधील समन्वयाचा अभाव
पाच वर्षांपूर्वी पाणी देयक वसुलीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाकडून मालमत्ता कर विभागाकडे वर्ग करण्यात आली. या निर्णयामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभाग केवळ पुरवठ्याकडे पाहतो, तर मालमत्ता विभाग वसुलीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. दोन्ही विभागांतील या ‘तू तू - मैं मैं’मुळे वसुलीची प्रक्रिया कोलमडली आहे.

यंत्रणा कमकुवत
वसुलीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फेरीवाला हटाव पथक किंवा इतर विभागांत केल्या जात असल्याने मुख्य काम रेंगाळले आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘टेबलाखालची’ देवाणघेवाण झाल्याच्या चर्चांनीही पालिका वर्तुळात उधाण आले आहे. एकूण वसुलीचा दर अवघा २६ टक्के राहिल्याने प्रशासकीय चिंतेत भर पडली आहे. बेकायदा जोडण्या तोडणे, गळती रोखणे आणि स्वतंत्र वसुली पथक स्थापन करणे, हे उपाय केल्याशिवाय ही १५३ कोटींची दरी भरून निघणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तपशील अपेक्षित लक्ष्य (कोटी) प्रत्यक्ष वसुली (कोटी) तूट (कोटी)
चालू देयक ७४.७१ ३२.०० ४२.७१
थकबाकी १२७.५६ १६.८० ११०.७६
एकूण २०२.२७ ४८.८० १५३.४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com