प्रस्तावित प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन
१. प्रस्तावित प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन
* १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण व संकलन, १०० टक्के संकलन केलेल्या कचऱ्याची वाहतूक
* घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया
* तृतीयपंथींसाठी शौचालय
* प्रायोगिक तत्त्वावर मेकॅनिक नालेसफाई
२. आरोग्य सुविधा
* ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रसूतिगृह व आरोग्य केंद्रामधील रुग्णांना २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे.
* ठाणे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानद वैद्यकीय तज्ज्ञांचे पॅनेल तयार करणे. तीन वर्षे कालावधीच्या या पॅनेलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओॉलॉजिस्ट, जनरल फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, मानसोपचार तज्ज्ञ, यूरोलॉजिस्ट, कान-नाक-घसा तज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
* पालिका रुग्णालयात किंवा दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना लागणारी औषधे खासगी मेडिकलमधून घेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून औषध चिठ्ठीमुक्त रुग्णालय ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रुग्णास आवश्यक असणारी सर्व औषधे पालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यात मोफत उपलब्ध होतील.
* हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम राबवून कामकाजामध्ये एक सूत्रता आणणार
* न्यूरोलॉजी युनिट तयार करणार, जेणेकरून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना डोक्याचा मार लागला असल्यास तातडीने उपचार करण्यास मदत मिळेल.
* रुग्णालयांमध्ये आयसीयू, एनआयसीयू युनिट उभारणार
* अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डी एडिक्शन सेंटर उभारणार
३. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणार
* ठाणे महापालिकेच्या १०३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण १२६ शाळा आहेत. त्यापैकी महापालिकेच्या २८ शाळा इमारतीत भरतात. तर ६२ शाळा या आदर्श शाळा करण्याकरिता महापालिका क्षेत्रात मूलभूत सेवा-सुविधा, विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाकडून ५० कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या शाळांचा कायापालट लवकरच करण्यात येईल.
* सीएसआर निधीतून शाळांमध्ये आधुनिक संगणक कक्ष, डिजिटल संच, डिजिटल अभ्यासक्रम असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासोबतच त्यांना पोषक आहार आणि सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी विविध उपक्रम ठाणे महापालिका राबवत आहे. विज्ञान मंच, बाल रंगकर्मी योजना राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही देण्यात येत आहे.
* २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
* पालिका शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर गत विद्यार्थी सुका कचरा एका बागेमध्ये जमा करतील व त्याचे शाळेत वजन करून तो घनकचरा विभागाकडे संपूर्ण करतील. जितका जास्त कचरा तितके जास्त गुण असा हिशेब करीत विद्यार्थी व शाळा यांना वार्षिक बक्षीस देण्यात येणार आहे.
४. महिला, ज्येष्ठ व दिव्यांग उपेक्षित
* ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी कोणत्याही नवीन योजना समाविष्ट नसल्याचे दिसून आले आहे. जुन्याच योजना नवीन स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत.
* कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य
* एकल महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य
* खेळाडूंकरिता गुणवत्ता शिष्यवृत्ती
* एकल महिलेच्या पुनर्वसनासाठी योजना
* महिला उद्योग भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याचे काम पूर्ण करून महिला बचत गटातील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

