ठाणे परिवहनच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य

ठाणे परिवहनच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य

Published on

ठाणे परिवहनच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य
७९१ कोटींचा अर्थसंकल्प; २४० बसचे सीएनजीत रूपांतर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७९१.८६ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला असून, प्रवाशांना सुसज्ज आणि स्वच्छ वाहतूक सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने परिवहन ताफ्यात मोठे बदल करण्याचे नियोजन असून, एकूण ३७० पर्यावरणपूरक बसगाड्या दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये पीएम ई-बस योजनेअंतर्गत १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस, १५व्या वित्त आयोगातून १६० इलेक्ट्रिक बस आणि १०० सीएनजी बसचा समावेश आहे. तसेच १० डबल डेकर बसगाड्यांची खरेदीही प्रस्तावित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत या बसगाड्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय सध्या ताफ्यात असलेल्या २४० डिझेल बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इंधन खर्चात बचत होण्याबरोबरच प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवाशांवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आलेला नाही. बसभाड्यात कोणतीही वाढ प्रस्तावित नसून, सेवा सुधारणा आणि बससंख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

बससंख्या अपुरीच
पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या निकषानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे ५० बसगाड्या आवश्यक असतात. ठाण्याची सध्याची लोकसंख्या सुमारे २७ लाख असून, शहरासाठी सुमारे १३५० बसगाड्यांची गरज आहे. मात्र सध्या उपलब्ध बससंख्या अपुरी असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. दररोज सुमारे तीन लाख प्रवासी परिवहन सेवेचा वापर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com