स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांवरून खडाजंगी
वाशी, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांनी ठराव किती मांडावे व प्रश्न किती विचारावे, याबद्दल सभागृह नेते सागर नाईक यांनी निवेदन सादर केले. यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
महापालिकेत एका स्वीकृत सदस्याने तब्बल २४ ठराव मांडले होते. यावर शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी संताप व्यक्त करीत सभागृहामध्ये आम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे. पण आता सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे का आम्हाला किती ठराव मांडून द्यायचे, असा सवाल उपस्थित केला. यावर शिवराम पाटील यांनी स्वीकृत सदस्याने दिघापासून बेलापूरपर्यंत कितीही ठराव मांडावे का, असा प्रश्न उपस्थित केला. चंद्रकात आंगोडे यांनी एका नगरसेवकाने २४ ठराव आणल्यामुळे आमच्या अधिकार क्षेत्रांवर गदा येत असल्याचे म्हटले.
पत्त्यावरून गदारोळ
सर्वसाधारण सभेतील प्रस्तावावर सागर नाईक यांच्या बोनकोडे येथील कार्यालयाचा पत्ता असल्याने नगरसेवक शिवराम पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. पालिकेचा प्रस्ताव बोनकोडे गावातून कसा काय आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पालिकेचे सभागृह हे हुकूमशाही पद्धतीने फक्त एकच व्यक्ती चालवत असल्याचा आरोप पाटील यांनी करीत पूर्वीचे सभागृह चांगल्या पद्धतीने चालत होते असे म्हटले. नगरसेविका अॅड. अपर्णा गवते यांनी आक्षेप घेत पूर्वी आणि आता सभागृहात फरक काय असल्याचा प्रश्न उपस्थित केला. पालिकेच्या सचिव संघरत्ना खिल्लारे यांनी पालिकेच्या लिपिकांकडून सभागृह नेते सागर नाईक यांनी दिलेला प्रस्ताव हा जसाच्या तसा पाठवण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याची कबुली देत यावर पडदा टाकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

