आजपासून सीईटी प्रवेश परीक्षांना सुरूवात

आजपासून सीईटी प्रवेश परीक्षांना सुरूवात

Published on

एमपीएडच्या सीईटीला
आजपासून सुरुवात

मुंबई, ता. २३ : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी घेतल्या जाणाऱ्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (एमपीएड) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेला मंगळवारपासून (ता. २४) सुरुवात हाेणार आहे. एमपीएडच्या सीईटीसाठी २,५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १,७८० पुरुष व ७४५ महिला आहेत. या वर्षीच्या नोंदणीत १९ अनाथ विद्यार्थीही एमपीएडची प्रवेश परीक्षा देणार आहेत.
या वर्षी १६ मेपर्यंत १७ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा हाेणार आहेत. या वर्षी १७ लाख ६३ हजार विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या तब्बल दाेन लाखांनी वाढली आहे. महाराष्ट्रातील पीसीबी, पीसीएम व एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रथमच सीईटीच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com