नालासोपाऱ्यात रिक्षावर झाड कोसळले
नालासोपाऱ्यात रिक्षावर झाड कोसळले

नालासोपाऱ्यात रिक्षावर झाड कोसळले नालासोपाऱ्यात रिक्षावर झाड कोसळले

Published on

नालासोपाऱ्यात रिक्षावर झाड कोसळले

नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेतील आचोळा रोड परिसरात सोमवारी दुपारी अचानक झाड कोसळून पार्क केलेल्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. रिक्षात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. घटनेमुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित रिक्षा रस्त्याकडेला पार्क करण्यात आली होती. अचानक झाड कोसळल्याने रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला; मात्र त्या वेळी रिक्षात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. याबाबत माहिती मिळताच वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com