मुंबईतील ३० लाख मालमत्ताधारकांना दिलासा

मुंबईतील ३० लाख मालमत्ताधारकांना दिलासा

Published on

मुंबईतील ३० लाख मालमत्ताधारकांना दिलासा

प्राॅपर्टी कार्डमधील फेरफार ऑनलाइन; ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

मुंबई, ता. २३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता मिळकत पत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून सुमारे ३० लाख मालमत्ताधारक नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साेमवारी (ता. २३) विधानसभेत केली.

विधानसभा नियम ४७अन्वये निवेदन करताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की ‘मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संधारणाची पद्धत वेगळी असल्याने मुंबईत संगणकीकरणात काही तांत्रिक अडचणी होत्या. जनतेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने यावर मार्ग काढला आहे. आता मुंबईतील १९ महसूल विभाग आणि चार नगररचना योजनांतील एकूण २७ हजार ८४७ संगणकीय मिळकत पत्रिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’

घरबसल्या अर्ज सुविधा अन्‌ ट्रॅकिंग
फेरफारासाठी अर्ज करण्यासाठी एनआयसी पुणे यांनी epsitmumc.mahabhumi.gov.in ही विशेष आज्ञावली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज भरता येणार आहे. त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मेसेजद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात गती येईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

या सुविधांचा समावेश
मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खरेदीखत, वारस नोंद, बक्षिसपत्र, भाडेपट्टा (लीज), गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन प्रक्रिया यांचा समावेश आहे. नागरिकांनी आता आपल्या मालमत्तेच्या कामांसाठी mahabhumi.gov.in किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com