कोस्टल रोड पूरमुक्त साठी २४ कोटी

कोस्टल रोड पूरमुक्त साठी २४ कोटी

Published on

कोस्टल रोड पूरमुक्तीसाठी २४ कोटी!
पाणी उपसण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप बसविणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः कोस्टल रोडवर पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी सुमारे ५०० ते १,००० क्युबिक मीटर क्षमतेचे पाणीउपसा करणारे पंप बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी चार वर्षांसाठी भाडेतत्त्वावर पंप घेण्यात येणार असून, मुंबई महापालिका २४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला आहे. गेल्या दोन पावसाळ्यांत कोस्टल रोडवर पाणी तुंबण्याची मोठी घटना घडलेली नाही; मात्र भविष्यात पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज १, २ आणि ४ मधील विस्तारित स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आउटफॉल्स येथे बसविण्यात आलेल्या स्लुईस गेट्सचे प्रचालन, परिरक्षण आणि डिवॉटरिंग पंप्स बसवण्यात येणार आहेत. पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी प्रतितास ५०० ते १,००० घनमीटर क्षमतेचे पंप बसविण्यात येणार आहेत. तसेच पंपांसोबत डिझेल जनरेटरची तरतूद करण्यात येणार असून, वीजपुरवठा खंडित झाल्यास पंप कार्यरत राहतील. त्यामुळे कोस्टल रोड परिसर, मरीन ड्राइव्ह, हाजी अली, वरळी आणि आसपासच्या किनारी भागात पावसाळी पाणी साचण्याचा धोका कमी होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
----
आणखी २० कोटींचा खर्च अपेक्षित
महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्ट सम्प पीट येथे ८ x ३००० घनमीटर प्रतितास, तर एल प्रभागातील पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी येथे ६ x ३,००० घनमीटर प्रतितास क्षमतेची पम्पिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कमी होऊन वाहतूक व नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com