पालिकेमुळे सातपाटीकरांना भूर्दंड
पालिकेमुळे सातपाटीकरांना भूर्दंड
रस्ता बंद असल्याने ज्यादा भाडे देण्याची वेळ
पालघर, ता.२३ (बातमीदार)ःपालघर नगर परिषदेकडून सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे पालघर-सातपाटी एसटी वाहतूक नियोजित मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
टेंभोडे सातपाटी मार्गाच्या काँक्रिटीकरणचे काम नगर परिषदने हाती घेतले आहे. सातपाटी एसटी वाहतूक पालघर रेल्वे स्थानक ते ते एसटी डेपो मार्गे शिवाजी चौक इथून आंबेडकर चौक जवळून टेंभोडे मार्गे सातपाटी होत आहे. पण या मार्गासाठी नियमित तिकीट भाडे आता १६ रुपयाऐवजी २१ रुपये करण्यात आले आहे. तसेच रिक्षा भाडे तेवढेच असल्याने प्रवाशांनी पालघर पाईप कंपनी मार्गे वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे.
------------------------
दोन महिने मनस्ताप
एसटी विभाग नियंत्रण कक्षाला एसटी प्रवासी संघटनेने पत्र देताना भाडेवार रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच काँक्रीटीकरणाचे काम अजून दोन महिने सुरू राहणार असल्याने प्रशासनाने हा रस्ता युद्ध पातळीवर करावा, अशी मागणी होत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

