बेंगळुरू शैक्षणिक दौऱ्याने मिळणार नवी दिशा
आदिवासी विद्यार्थ्यांचा विमानातून प्रवास
शैक्षणिक दौऱ्यासाठी २०० विद्यार्थी बेंगळुरूला जाणार
जव्हार, ता.२४ (बातमीदार)ः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत आश्रमशाळेतील २०० विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरू येथे शैक्षणिक दौरा काढण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रथमच विमानातून प्रवास करण्याची संधी मिळाली आहे.
जव्हार, विक्रमगड आदिवासी बहुल भागातील काही गावांमध्ये अजूनही नियमित बससेवा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत प्रथमच विमानाने प्रवासाची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानला जात आहे. या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी बेंगळुरू येथील सर विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, एअरफोर्स म्युझियम, एचएएल एरोस्पेस म्युझियमला भेट देता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
------------------------------------------
उपक्रमाचे कौतुक
- पालघर जिल्ह्यातील १०० विद्यार्थिनी २८ मार्चला विमान प्रवास करत शैक्षणिक सहलीसाठी बेंगळुरूला जाणार आहेत. अनेकांच्या आयुष्यातील हा पहिलाच विमान प्रवास असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
- या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड तसेच प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

