आपत्तीविरोधात ‘आपदा मित्रांची’फौज

आपत्तीविरोधात ‘आपदा मित्रांची’फौज

Published on

आपत्तीविरोधात ‘आपदा मित्रांची’फौज
५०० स्वयंसेवकांना १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण
बोईसर, ता.२४ (वार्ताहर): आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पातळीवर सक्षम स्वयंसेवकांसाठी जिल्ह्यात ‘आपदा मित्र’ योजनेला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत पालघर जिल्ह्यात ५०० स्वयंसेवकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २०० स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ३०० जणांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी /एनएसएस स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, आशा सेविका, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण, आपत्कालीन किट, ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
--------------------------------
संपर्काचे आवाहन
‘आपदा मित्र’ म्हणून निवड होण्यासाठी उमेदवार देशाचा नागरिक, संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असावा, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे ठेवली आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भागडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com