आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेची यात्रा
आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेची यात्रा
गळ लावणे हे यात्रेचे प्रमुख आकर्षण
रोहा ता.२४ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेची पारंपरिक यात्रा मंगळवारी (ता.३१ मार्च) व बुधवारी (ता.१ एप्रिल) होणार आहे. यात्रेची तयारी जोरात सुरू असून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
प्राचीन परंपरेनुसार गुराख्याला देवीचे दर्शन झालेल्या ठिकाणी हे स्वयंभू स्थान मानले जाते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हा उत्सव भरतो व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक येथे गर्दी करतात. यात्रेत मिठाई, खेळणी तसेच नवसाच्या काठ्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते. ‘गळ लावणे’ हा पारंपरिक धार्मिक विधी हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सहा भक्तांना गळ लावण्याची परंपरा असून विविध गावांतील मानाच्या काठ्यांची मिरवणूक हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या उत्सवासाठी निडी, कोपरे, झोलांबे, लक्ष्मीनगर, वरवडे, पाले (तर्फे अष्टमी), आरे बुद्रुक आदी परिसरातील मानाच्या काठ्या सहभागी होणार आहेत.
मंगळवारी दुपारी १२ वाजता पालखी मिरवणूक सुरू होऊन झोलांबे, कोपरे व लक्ष्मीनगर मार्गे सायंकाळी पुन्हा भातसईत येईल. दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवात भाविकांची मोठी उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
फोटो कॅप्शन : श्री महादेवी मातेच्या पालखी व यात्रेच्या निमित्ताने श्रद्धेपोटी गळ लावलेले भक्तगण दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

