पोयनाडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पोयनाडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Published on

पोयनाडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर
पोयनाड, ता. २३ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे श्रीराम मंदिर ट्रस्ट, उज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मंदिर पटांगण रामआळी येथे झालेल्या शिबिरात जवळपास ७० पेक्षा अधिक लाभार्थींनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, नेत्ररोग तपासणी, कर्करोग, हृदयरोग, अस्थिरोग तपासणी करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले. तसेच गरजूंना पुढील उपचाराकरीता वाशी येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अलिबागमधील आस्था नेत्रालय येथे बोलविण्यात आले आहे. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. राजाराम हुलवान, डॉ. नितीन गांधी, डॉ. उज्ज्वला चंदनशिव, डॉ. गौरव पाटील, डॉ. श्रेयस सोमनाथ, आस्था नेत्रालय यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
श्रीराम मंदिर ट्रस्ट पोयनाडचे ट्रस्टी सुनिल पाटील, रमेश तावडे, दिपक चवरकर, सदस्य किशोर तावडे, देवेंद्र केळुस्कर, दिलीप कारेकर, विजेंद्र तावडे, अजय टेमकर, राजेश जाधव, चंद्रशेखर मसुरकर, नंदकुमार पाटील, सुयोग राऊत, अंकिता चवरकर, मनिषा टेमकर, लीना चवरकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com