उन्हाच्या झळांनी वज्रेश्वरी तीर्थक्षेत्र ओस
वज्रेश्वरी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील धार्मिक व पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असलेले वज्रेश्वरी देवी मंदिर, गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद मंदिर; तसेच अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड या परिसराला वाढत्या उन्हाचा फटका बसला आहे. संपूर्ण परिसर सध्या ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
तानसा नदीच्या तिरावर वसलेले वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ नेहमीच भाविक व पर्यटकांनी गजबजलेले असते. तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्र झाला आहे. परिणामी, तानसा नदीकाठावरील या तिन्ही तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची संख्या घटल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. या परिसरात विविध प्राचीन व पौराणिक मंदिरे, गरम पाण्याची कुंडे, वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर, महायोगी श्री नित्यानंद स्वामी समाधी मंदिर; तसेच प्राचीन भीमेश्वर महादेव मंदिर यांसारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. याशिवाय, निसर्गसंपन्न परिसरामुळे येथे पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असतात. सध्या वाढत्या उष्णतेमुळे या ठिकाणांवरील वर्दळ कमी झाली असून, परिसरात शुकशुकाट पसरला आहे. त्यातच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने भाविकांची संख्या आणखी घटल्याचे दिसून येत आहे. संध्याकाळच्या वेळेत काही प्रमाणात स्थानिक नागरिक कुंड परिसरात फेरफटका मारताना दिसतात; मात्र दिवसभर तीव्र उन्हामुळे संपूर्ण परिसर ओस पडलेला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

