वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सचान यांना आदरांजली

वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सचान यांना आदरांजली

Published on

डोंबिवलीच्या वीरपुत्राला २३ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली
कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण
कल्याण, ता. २४ (बातमीदार): मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले डोंबिवलीचे सुपुत्र कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी (ता. २४) त्यांना शहरात मानाचा मुजरा करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.

कॅप्टन सचान यांच्या बलिदानाची स्मृती जपण्यासाठी प्रतिवर्षी २४ मार्च रोजी या गौरव सोहळ्याचे आयोजन केले जाते. मंगळवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात कॅप्टन सचान यांचे वडील राजाबेटा सचान आणि माता सुधा सचान यांनी आपल्या वीरपुत्राच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. आपल्या पुत्राच्या शौर्याची आठवण काढताना माता-पित्यांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. महापालिकेचे माजी उपमहापौर राहुल दामले, पद्मश्री गजानन माने, हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्त लेफ्टनंट कमांडर डॉ. सुनील कांबळे यांनी स्मारकास अभिवादन केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये पालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासह रेखा चौधरी, महेश पाटील, सुनीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभक्तीची प्रेरणा
केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे, तर डोंबिवलीतील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकही या वीरपुत्राला वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. ''कॅप्टन विनयकुमार सचान अमर रहे'' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अशा बलिदानाच्या स्मृती जपणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com