वसई मध्ये पालघर ग्रंथोत्सवाचे आयोजन

वसई मध्ये पालघर ग्रंथोत्सवाचे आयोजन

Published on

वसईमध्ये ‘पालघर ग्रंथोत्सवा’चे आयोजन

विरार, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महापालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पालघर आणि मनोहर वाचनालय, माणिकपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वसईमध्ये ‘पालघर ग्रंथोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. २७), शनिवारी (ता. २८) हे ग्रंथोत्सव समाजोन्नती मंडळ संचालित मनोहर वाचनालय, माणिकपूर, वसई येथे पार पडणार आहे.
या ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यावेळी प्रसिद्ध साहित्यिक वीणा गवाणकर आणि पालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी यांची खास उपस्थिती असेल. या ग्रंथोत्सवाचे उद्‍घाटन आमदार स्नेहा दुबे-पंडित, महापौर अजीव पाटील आणि नाटककार अशोक समेळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ‘शतगुणी अहिल्यादेवी’ यावर प्रा. माधवी कवी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमांतर ‘नाचणी संस्कृती : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात जगदीश संसारे, चांगदेव काळे, दर्शना चौधरी आणि डॉ. महादेव इरकर सहभागी होणार आहेत.
शनिवारी पहिल्या सत्रात ‘अक्षर सुगंध दुर्मिळ साहित्याचा’ यामध्ये तपस्या मेत्रे आणि सुधीर चित्रे सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘लेखन प्रवास : डिंपल प्रकाशनची ५० वर्षे’ यात अशोक मुळे यांची मुलाखत अश्विनी भोईर घेणार आहेत. त्यानंतर कविसंमेलन रंगणार असून, यात जवळपास २० कवी सहभागी होतील. तसेच संध्याकाळच्या सत्रात पालघर जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपाल यांच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com