महालक्ष्मी यात्रेची लगबग सुरू
महालक्ष्मी यात्रेची लगबग सुरू
प्रशासनाकडून पूर्वतयारीला सुरुवात
कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रा आठ दिवसांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण असून महालक्ष्मी मंदिर परिसरात पाळणे, झुले, करमणुकीची साधने, सर्कस, जादूचे प्रयोग तसेच विविध दुकानदारांची लगबग सुरू झाली आहे.
महालक्ष्मी यात्रा १५ ते २० दिवस भरते. यानिमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत यात्रा भरत असल्याने वाहतूक कोंडी तसेच पार्किंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. कासा पोलिस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष देशमुख, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी चंदू डोंगरकर उपस्थित होते. यात्रेत सहभागी होणाऱ्या दुकानदारांसाठीच्या सुविधा, भाविकांसाठी व्यवस्था तसेच गर्दी नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, वीजपुरवठा तसेच दर्शनासाठी सुलभ व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-------------------------------
चार ठिकाणी सहाय्य केंद्र
कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चार ठिकाणी तात्पुरते पोलिस सहाय्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार असून सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. तसेच दुकानदारांची संपूर्ण माहिती, नोंद ठेवली जाणार असून यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

