नदी पुलावर कामगाराचा मृत्यू

नदी पुलावर कामगाराचा मृत्यू

Published on

नदी पुलावर कामगाराचा मृत्यू
बोईसर, ता.२४ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीत कामावर निघालेल्या बोईसरच्या एका कामगाराचा चिल्हार मार्गावरील फुलाचा पाडा परिसरातील सूर्या नदी पुलावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सुदाम धांगडाचा (वय ३६, रा.कोंढाण) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सूर्या नदी पुलावर दुचाकी घसरल्याने धांगडा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती चिंताजनक असल्याने मीरा रोड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
-------------------------------
हस्तांतरणावरून वाद
तारापूर एमआयडीसीला जोडणारा बोईसर-चिल्हार मार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून हजारो कामगार, अवजड वाहने प्रवास करतात. मात्र, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागातील हस्तांतरणाच्या प्रश्नामुळे दुरुस्ती रखडल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com