ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी पाऊल
ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी पाऊल
‘पल्स वैद्यकीय परिषदे’ची तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, ‘पल्स वैद्यकीय परिषद’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी परिषदेच्या नियोजनासाठी काटेकोर तयारी करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे २७ व २८ मार्चला ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत विविध देशांतील नामांकित तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधी राज्याला उपलब्ध होणार आहेत. तसेच सुमारे ३० संस्थांसोबत सामंजस्य करार होण्याची शक्यता असून, आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या परिषदेत आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वसमावेशक आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, स्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रातील विविध घटक या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. यामुळे नव्या कल्पना, सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊन रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, डॉक्टरांना नव्या संधी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळणार आहे.
...
समन्वयाने नियोजन
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, एमएमआरडीए, उद्योग विभाग, मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांच्यासह विविध संस्थांच्या समन्वयाने नियोजन सुरू असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ही परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळवून देणारी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

