भोंदूबाबा खरात प्रकरण; माहिती असताना मुख्यमंत्र्यांनी सहा महिने झोपा काढल्या काय?
मुख्यमंत्र्यांनी सहा महिने झोपा काढल्या काय?
खरातप्रकरणी सपकाळ यांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः ‘दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर- नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. गृहविभाग पुरावेही गोळा करीत होता; मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का,’ असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
याप्रकरणी एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गजाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले, की अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे, यातून आपण धडा घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात, जातीजातीत वाद कोण निर्माण करीत आहे, द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहिती आहे. यातूनच खरातसारख्या विकृती जन्माला येतात, याची दखल घेतली पाहिजे. समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच खरातसारखे विकृत निर्माण होतात. खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे काम पुढे घेऊन गेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरातसारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.
...
मंत्रीच मार खातात!
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली असून मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनीच मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हा लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे, तसेच साताऱ्यात जे झाले त्यातून वोटचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

