इमारती, रुग्णालयांत ‘हायटेक’ सुरक्षा कवच
इमारती, रुग्णालयांत हायटेक सुरक्षाकवच
मेटल डिटेक्टर बसवण्याचा पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह प्रमुख रुग्णालये आणि संवेदनशील विभागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर प्रणाली बसवून सुरक्षेला हायटेक स्वरूप देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या कार्यालये आणि रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असल्याने संभाव्य सुरक्षेच्या धोक्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मुख्यालय, प्रमुख रुग्णालये, विभागीय कार्यालये तसेच केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये अत्याधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात येणार आहेत.
ही प्रणाली व्यक्तीच्या अंगावर लपविण्यात आलेली शस्त्रे, स्फोटके किंवा इतर धातूच्या वस्तू ओळखण्यास सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तत्काळ नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांच्या हालचालींमध्ये अडथळा न आणता तपासणी प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार आहे. ही यंत्रणा सीसीटीव्ही आणि बॅगेज स्कॅनरसारखीच प्रभावी ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी महापालिकेला चार निविदा प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन निविदा पात्र ठरल्या आहेत. मेसर्स सिक्युरिटी सिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीने सुमारे १.१९ कोटी रुपयांची सर्वात कमी बोली लावली असून, त्यांच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात आली आहे.
चार महिन्यांत अंमलबजावणी
प्रकल्पाची अंमलबजावणी पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, ठेकेदाराकडून एक वर्षासाठी मोफत देखभाल सेवा देण्याची अट घालण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महापालिकेच्या संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

