सैन्य, पोलिस दलात भरतीची सधी
सैन्य, पोलिस दलात भरतीची संधी
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पळसुंडेत प्रशिक्षण
पालघर, ता. २४ (बातमीदार) ः जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना सैन्य, पोलिस भरतीपूर्वीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडे येथे पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया १ एप्रिलला सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीद्वारे सुरू होणार आहे.
पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून अंतिम निवड यादी २ एप्रिलला जाहीर केली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात भोजनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, त्याबाबत निवड झालेल्या महिलांना स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान १५० सेंमी उंची, किमान ४५ किलो वजन, वय १८ ते २६ वर्षे आणि किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. तसेच उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
-----------------------------
आवश्यक कागदपत्रे
निवड प्रक्रियेसाठी येताना शाळा सोडल्याचा दाखला, बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, नावनोंदणी प्रमाणपत्र अशी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

