मुंबई
रुक्मिणी दंगटेचा पजांबमध्ये सुवर्णवेध
रुक्मिणी दंगटेचा पंजाबमध्ये सुवर्णवेध
जव्हार, ता. २४ (बातमीदार) ः कोरतड ग्रामपंचायती हद्दीतील सावरपाडा येथील रुक्मिणी दंगटेने पंजाबमधील वीर भगतसिंग नॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर धावण्याच्या गटात प्रथम क्रमांक पटकावले आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही तिने आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवले. या कामगिरीमुळे सावरपाडा गावाची ओळख राज्यभर पोहोचली असून अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रुक्मिणीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची शिखरे सर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

