लाडक्या बहिणींनी लाभासाठी ३१ मार्चपूर्वी ई केवायसी करणे आवश्यक
लाडक्या बहिणींनी लाभासाठी ३१ मार्चपूर्वी ई केवायसी करणे आवश्यक
कामोठे, ता.२४ ( बातमीदार ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील २२,३७५ महिलांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील ५,१४० महिलांचा समावेश आहे. लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण झाला असून लाडक्या बहिणींना लाभासाठी ३१ मार्चपूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण स्वावलंबन वाढवणे व कुटुंबाच्या आर्थिक स्तरियास हातभार लावणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना २०२४ पासून सुरू करण्यात आलेली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत एकूण ६३,७८२ महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ती प्रक्रिया चुकीची अपूर्ण असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. तसेच पनवेल तालुक्यातील ५,१४० महिलांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. तरी ही केवायसी प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

