नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात
नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात
नेरूळ, ता.२४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मुख्य जलकुंभांच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता तसेच पाणीपुरवठा विभागातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जागतिक जलदिन साजरा केला. जागतिक जलदिनाचे औचित्य साधून सर्व ठिकाणी सामुहिक जलशपथ घेण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघ यांनी १९९३ पासून २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पाणी ही जीवनावश्यक संपत्ती असून त्याचे संवर्धन व काटकसरीने वापर करण्याचा संदेश यानिमित्त देण्यात आला.
यावर्षी ‘पाणी आणि लिंगभाव : जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि ‘कॅच द रेन’ अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प करत स्वतःसोबत कुटुंबीय, मित्र आणि समाजातही जनजागृती करण्याची प्रतिज्ञा सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

