उद्यानांमध्ये संगीत पुन्हा सुरू करण्याची मागणी

उद्यानांमध्ये संगीत पुन्हा सुरू करण्याची मागणी

Published on

उद्यानांमध्ये संगीत पुन्हा सुरू करण्याची मागणी
नेरूळ, ता.२४ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानात बंद अवस्थेत असलेल्या संगीत यंत्रणेमधील संगीत पुन्हा सुरु करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखील मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानामध्ये संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. तथापि या संगीत यंत्रणेमध्ये वाजविली जाणाऱ्या गाण्यांच्याबाबतीत रॉयल्टी आणि कॉपी राइट प्रकरणामुळे संगीत यंत्रणा सध्या बंद अवस्थेत आहेत. सकाळी उद्यानात फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या कानावर सुमधुर संगीत पडल्यास त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्यामुळे संगीत यंत्रणेतून गाणी न वाजता वाद्यसंगीत वाजविल्यास महापालिका प्रशासनाला रॉयल्टी अथवा कॉपी राइटच्या वादाला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उद्यानांमध्ये बसविलेल्या संगीत यंत्रणेतून वाद्य संगीत सुरु करण्याचे निर्देश देण्याची मागणी निखील मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com