दिवाळे गावातील मच्छी विक्रेत्यांना गाळ्यांचे ताबा पावतीवाटप

दिवाळे गावातील मच्छी विक्रेत्यांना गाळ्यांचे ताबा पावतीवाटप

Published on

दिवाळे गावातील मच्छी विक्रेत्यांना गाळ्यांचे ताबा पावतीवाटप
तुर्भे, ता २४ (बातमीदार) : दिवाळे गावात आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून आधुनिक आणि सुसज्ज मासळी मार्केट उभारण्यात आले आहे. या मासळी मार्केटमधील उर्वरित १७ गाळ्यांचे अधिकृत वाटप नुकतेच मच्छी विक्रेत्या महिलांना करण्यात आले. या वाटप सोहळ्यास माजी नगरसेवक व भाजपा नवी मुंबई जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे तसेच सहायक आयुक्त व विभाग अधिकारी प्रशांत नेरकर उपस्थित होते. १७ गाळ्यांच्या ताबा पावत्या महिलांना सुपूर्द करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक मच्छीमार महिलांना हक्काचे, सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्यवसायिक स्थान उपलब्ध झाले आहे. नव्या मासळी मार्केटमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज तसेच संरक्षित विक्री व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या व्यवसायात स्थिरता येण्यास आणि उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com