मिरा भाईंदर महापालिकेचे क्षयरोग मुक्त भारत अभियान

मिरा भाईंदर महापालिकेचे क्षयरोग मुक्त भारत अभियान

Published on

क्षयरोगमुक्त भारत अभियानाला सुरुवात
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : जागतिक क्षयरोगदिनानिमित्त मिरा-भाईंदर महापालिकेकडून क्षयरोगमुक्त भारत ही १०० दिवसांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २४) या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
क्षयरोगमुक्त भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमावरील कार्यक्रमांपैकी एक महत्त्वाची आरोग्यविषयक मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील अति जोखमीच्या एक लाख ५४ हजार ७८८ लोकसंख्येमधील मधुमेहबाधित व्यक्ती, अनाथाश्रमातील व्यक्ती, मागच्या पाच वर्षांतील क्षयरोगाचे रुग्ण, मागच्या तीन वर्षांपासून क्षयरुग्णांच्या सान्निध्यातील सहवासित व्यक्ती, ६० वर्षांवरील वयोवृद्ध, १८.५ पेक्षा कमी बीएमआय असलेल्या व्यक्ती, धूम्रपान करणारी व्यक्ती, डायलिसिसवर असलेल्या व्यक्ती, कर्करोगबाधित व्यक्ती, व्यसनाधिन व्यक्ती यांची निवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वृद्धाश्रम, अनाथाश्रम, निराधार केंद्र, रात्र निवारा केंद्र, निवासी शाळा, झोपडपट्टी, उद्योग कामगार आणि एचआयव्ही कार्यक्षेत्र येथील सर्व क्षयरोग संशयित रुग्णांची नेट व क्ष-किरण तपासणी करून त्यांना औषधोपचार सुरू केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात येणाऱ्या संशयित रुग्णांची वर्षभरात एक जरी क्ष-किरण तपासणी झाली असेल तर त्या क्ष-किरण तपासणी अहवालानुसार संबंधित रुग्णाची औषधोपचार प्रणाली ठरविली जाणार आहे. या मोहिमेमुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होणार आहे. आरोग्य केंद्रनिहाय अतिजोखमीच्या लोकसंख्येतून जास्तीत जास्त क्षयरुग्णांचे निदान करून त्यांच्यावर उपचार करणे व क्षयरोगाची साखळी खंडित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर यांनी दिली. या वेळी डॉक्टर्स फॉर यू आणि किट्टो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com