ठाणे रेल्वे स्थानकातील कचऱ्याच्या प्रश्नावर प्रवासी संघटना आक्रमक
रेल्वे स्थानकातील कचऱ्याच्या प्रश्नावर प्रवासी संघटना आक्रमक
ठाणे, ता.२४: ठाणे रेल्वे स्थानकातील छतांवर तसेच फलाट परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेकडून करण्यात आला आहे.
प्रवासी संस्थेच्या मते, स्थानकाच्या विविध भागांत विशेषतः छतांवर कचरा साचत असून नियमित साफसफाई केली जात नाही. परिणामी, दुर्गंधी पसरत असून प्रवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दररोज लाखो प्रवासी ये-जा करणाऱ्या या स्थानकात स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, येत्या १६ एप्रिल रोजी रेल्वेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. अशा वेळी स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढणारा कचरा ही चिंतेची बाब असल्याचे प्रवासी संघटनेने नमूद केले. छतांवर साचलेल्या कचऱ्याच्या वाढत्या वजनामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

