आैषधांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी मार्गदर्शनपर मुलाखत
औषधांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी मार्गदर्शनपर मुलाखत
मुलुंड, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र सेवा संघातर्फे औषधांबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी माहितीपूर्ण मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात ‘जेनेरिक औषधे कमी दर्जाची असतात’ असा गैरसमज प्रचलित आहे. हा समज दूर करण्यासाठी या विशेष मुलाखतीतून जनजागृती केली जाणार आहे. स्वस्त औषधे ही फसवणूक नसून, विज्ञानाचा महत्त्वपूर्ण विजय असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. तसेच औषधांचा योग्य वापर, त्यांची किंमत आणि एक्स्पायरी तारखांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. या मुलाखतीत औषधतज्ज्ञ डॉ. मंजिरी घरत मार्गदर्शन करणार असून, मधुमेहतज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर हे मुलाखतकार असतील. हा कार्यक्रम शनिवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता मुलुंड (पश्चिम) येथील सुविधा शंकर गोखले सभागृहात होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

