वडपाडा, धामणीत टॅंकरचे पाणी
वडपाडा, धामणीत टॅंकरचे पाणी
खासदार डॉ. हेमंत सवरांच्या सूचनेनंतर दिलासा
मोखाडा, ता. २४ (बातमीदार) ः मोखाड्यातील काष्टी ग्रामपंचायतीमधील वडपाडा तसेच धामणी गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. येथील नागरिकांनी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे केली आहे. सवरा यांनी प्रशासनाला सूचना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मोखाड्यातील गाव-पाड्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काष्टी, वडपाडा, आसे ग्रामपंचायतीमधील धामणी गावाला भीषण पाणीटंचाईने ग्रासले होते. दहा दिवस उलटूनही येथे शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. दरम्यानच्या काळात खासदार डॉ. हेमंत सवरांनी मोखाडा तालुक्याचा दौरा केला. त्या वेळी आदिवासींनी पाणीटंचाईची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यानुसार सवरा यांनी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता अजित मुळे यांना सूचना दिल्या. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अक्षय पगार यांना दिली होती. त्याप्रमाणे दोन्ही गाव टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे.
--------------------
दोन्ही पाड्यांचे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. खासदार डॉ. हेमंत सवरांच्या सूचनेनुसार टँकरद्वारे पाणी दिले आहे.
- अक्षय पगार, गटविकास अधिकारी, मोखाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

