सूर्या नदीत बुडून एकाचा मृत्यू
सूर्या नदीत बुडून एकाचा मृत्यू
फुलाचा पाडा परिसरातील घटना; वॉचमन असल्याचा संशय
मनोर, ता.२४ ः बोईसर पूर्वेकडील लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील फुलाचा पाडा येथे सूर्या नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनास्थळी संबंधित व्यक्तीचा मोबाईल, शर्ट आढळून आल्याने ही व्यक्ती नागझरी नाका येथे वॉचमन म्हणून काम करत असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाने सकाळी शोधमोहीम राबवली; मात्र सुरुवातीला त्यांना यश आले नाही. त्यामुळे वसई येथून अतिरिक्त अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले असून शोधकार्य सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

