हाय पॉवर कमिटीचे निर्देश

हाय पॉवर कमिटीचे निर्देश

Published on

वायू प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली जारी
नोटीस बजावल्यानंतरही काम सुरू असल्यास परवानगी रद्द करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : शहरात वाढणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केली आहे. दरम्यान, नियमावलीचे पालन होत नसल्यास स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात येते. मात्र स्टॉप वर्क नोटीस बजावल्यानंतरही काम सुरू असल्यास संबंधितांच्या सर्व परवानग्या रद्द करण्यात याव्यात, असे निर्देश हाय पॉवर कमिटीने दिले आहेत.
यासंदर्भात हाय पॉवर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत वायू प्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घेत समिती सदस्यांनी स्पष्ट निर्देश दिले, की स्टॉप वर्क (काम थांबवण्याबाबत) नोटिस दिल्यानंतरही एखादा विकसक बांधकाम सुरू ठेवत असल्यास त्याला महापालिकेकडून मिळालेल्या सर्व परवानग्या रद्द कराव्यात. तरीही आदेशाचे पालन न झाल्यास पोलिसांची मदत घेऊन तातडीने काम बंद करण्यात यावे. वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करवून घेणे ही संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
-----
पालिका विभाग अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिस
समितीने प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याला आपल्या हद्दीत प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, नोटिसांची कारवाई आणि इतर कामांचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालांच्या आधारे समिती बांधकाम स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिस बजावली जाऊ शकते. तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com