सिडको सेंटरमध्ये अवतरला ‘मिनी महाराष्ट्र’!
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : पूर्वी केवळ पुरुषप्रधान संस्कृतीची चर्चा होत असे, पण आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यासाठी नवी मुंबई महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन महापौर सुजाता पाटील यांनी केले. ३ एप्रिलपर्यंत मुंबई आणि नवी मुंबईकरांना या ‘मिनी महाराष्ट्रा’चा अनुभव घेता येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांची जिद्द, कौशल्य आणि अस्सल पारंपरिक कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाची सुरुवात मंगळवारी (ता. २४) वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला. या उद्घाटन सोहळ्यावेळी महापौर पाटील बोलत होते. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी दादासाहेब कांबळे व नारायण गोरे, अवर सचिव धनवंत माळी, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलूजा सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र पाटील यांनी महिलांच्या प्रगतीचा गौरव करताना, ‘सरस’ला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असून येथील उलाढाल सातत्याने वाढत आहे. यात महिलांचा सहभाग आणि उत्साह अधिक वाढावा, यासाठी राज्यातील सर्व महामंडळे एकत्र करून कर्ज वाटपाची संकल्पना राबवण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले.
‘उमेद’चे सीईओ सागर यांनी, ‘महालक्ष्मी सरस’ने महिलांच्या पंखात बळ दिले आहे. आता आमचे उद्दिष्ट राज्यातील १ कोटी महिलांना ’लखपती दीदी’ करण्याचे आहे. आज ४२०० हून अधिक उत्पादने ऑनलाइन उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आणि पॅकेजिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

