गडकरी रंगायतनमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गडकरी रंगायतनमध्ये महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
ठाणे, ता. २४ : येथील गडकरी रंगायतनमध्ये नाटकादरम्यान महिला मेकअप रूममध्ये अनोळखी व्यक्ती आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महिला कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
गडकरी रंगायतन येथे नाटक सुरू असताना महिला मेकअप रूममध्ये तीन अज्ञात व्यक्ती आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (ता. १३) ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगावेळी हा प्रकार घडला. नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती वॉशरूममध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास थांबले होते. कपडे बदलत असलेल्या महिला कलाकाराला संशय आल्याने हा प्रकार उघड झाला. आरडाओरड होताच ते पळून गेले. याप्रकरणी तक्रार करूनही सहकार्य मिळाले नाही, तसेच धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, व्यवस्थापक भारत गादेगावकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. घटनेनंतरही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

