महासभांचे थेट प्रक्षेपण सुरू करा

महासभांचे थेट प्रक्षेपण सुरू करा
Published on

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा पाया आहे. त्यांच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर महापालिकेच्या सर्व महासभांचे थेट प्रक्षेपण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका स्नेहा मेहुल पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे

राज्य विधानसभेचे तसेच संसद भवनातील कामकाज ज्या पद्धतीने थेट जनतेपर्यंत पोहोचविले जाते, त्याच धर्तीवर महापालिकेच्या महासभांचे कामकाजही नागरिकांसाठी खुले व उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. शहरातील नगरसेवक महासभेत नागरिकांचे प्रश्न, विकास आराखडे, आर्थिक तरतुदी, धोरणात्मक निर्णय आणि विविध प्रशासकीय विषय मांडत असतात. मात्र, सध्याच्या स्थितीत या कामकाजाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत नसल्याने गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व नियमित आणि विशेष महासभांचे थेट प्रक्षेपण अधिकृत संकेतस्थळ, समाज माध्यम प्लॅटफॉर्म तसेच आवश्यक असल्यास स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी मागणी प्रभाग क्र. १६ (क) येथील नगरसेविका स्नेहा मेहुल पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक तरतूद तातडीने करण्यात यावी. तसेच स्वतंत्र यंत्रणा, रेकॉर्डिंग व्यवस्था आणि संग्रह प्रणाली विकसित करून ही सुविधा कायमस्वरूपी स्वरूपात कार्यान्वित करावी, असेही त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे.
लोकशाही मूल्यांना बळकटी देणाऱ्या या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणीबाबतची कार्यवाही लेखी स्वरूपात कळवावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र मनपा आयुक्त अनमोल सागर यांना सादर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com