जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकासाठी आजपासून करारनामा
जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकासासाठी आजपासून करारनामा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी उद्या बुधवारपासून म्हाडाकडून रहिवाशांसोबत कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा (पर्मनंट अकोमोडेशन अल्टरनेट ॲग्रीमेंट) केले जाणार आहे. त्यासाठी या वसाहतीत म्हाडाने तात्पुरते कार्यालय उघडले आहे.
१९९०च्या दशकात पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पूनमनगर येथे पीएमजीपी वसाहत उभारली असून, त्यामध्ये चारमजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी असे एकूण ९८४ गाळे आहेत. संरचनात्मक अहवालानुसार सध्या या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहतीचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास करणार असून, रहिवाशांना प्रत्येकी ४५० चौरस फुटांची सदनिका मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने पुनर्विकासानंतर दिल्या जाणाऱ्या सदनिकेबाबत म्हाडा आणि रहिवाशांसोबत ‘पीएएए’ करार केला जाणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या कराराला रहिवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे म्हाडाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

