

४६० तक्रारींचे पालिकेकडून निराकरण
विरार, ता.२५ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या ‘सफाई मित्र’ अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अॅपद्वारे आत्तापर्यंत ४६० तक्रारींचे निराकरण केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
वसई-विरारमध्ये कचऱ्याची समस्या सातत्याने डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे, तक्रारी करूनही काही भागांत कंत्राटदारांकडून होणारी दिरंगाईमुळे नागरिक हैराण झाले होते. याच अनुशंगाने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘सफाई मित्र’ अॅप विकसित करण्यात आले. अवघ्या आठ दिवसांत अॅपवरील ४६० तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. या तक्रारींचे पालिका प्रशासनाने तातडीने निवारण केले आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.