

शाळेत जाण्याची पायपीट थांबली
डहाणू तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
कासा, ता. २५ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातून पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला गती देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे पीअर संस्थेने ५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातून शाळेपर्यंतची पायपीट कायमची थांबली आहे.
कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा डॉ. भावना त्रिवेदी, सचिव तेजल पुरोहित तसेच कॅनरा रेबेकोच्या पूनम पुरोहित उपस्थित होते. या वेळी कॉ. शामराव परुळेकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य किशोर चवरे, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत महाळनर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवदर्शन वाले यांनी उपस्थित मान्यवर, संस्था व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला नवी दिशा मिळाली असून शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.