कृषी प्रतिष्ठानकडून पोलिसांचा सन्मान

कृषी प्रतिष्ठानकडून पोलिसांचा सन्मान
Published on

कृषी प्रतिष्ठानकडून पोलिसांचा सन्मान
वाणगाव (बातमीदार): डहाणूतील एका वस्तीगृहातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीला अवघ्या मिनिटात पोलिसांनी शोधून काढले होते. या घटनेमुळे डहाणू पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आजारी असल्याने दवाखान्यात जाते असल्याचे कारण सांगून महाविद्यालयीन विद्यार्थी वस्तीगृहाच्या परवानगीने बाहेर गेली होती. परंतु, वेळेत परत वस्तीगृहात आली नसल्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वाणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी तुषार पाचपुते यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते यांसह त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब तातडीने शोध मोहीम सुरू केली. तसेच अवघ्या पंधरा मिनिटात विद्यार्थिनीला शोधण्यात यश मिळविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com