गटारातील गाळ रस्त्यावरच ठेवल्याने नागरिक त्रस्त

गटारातील गाळ रस्त्यावरच ठेवल्याने नागरिक त्रस्त
Published on

गटारातील गाळ रस्त्यालगत ठेवल्याने नागरिक त्रस्त

जोगेश्‍वरी, ता. २५ (बातमीदार) : अंधेरी (पश्चिम) येथील लल्लूभाई पार्क, भरूचा रोड, विजयनगर परिसरातील उद्यानासमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या चार दिवसांपासून भूमिगत गटराचा गाळ उपसण्यात आला. या बाबीला चार दिवस झाले तरी तो गाळ अद्याप उचलण्यात न आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संपूर्ण रस्त्यालगत गटारातून काढलेल्या या गाळाने येथील अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा गाळ पूर्णपणे सुकला असून, त्यातून दुर्गंधीही पसरू लागली आहे. पालिकेच्या नियमानुसार गटात साफसफाईनंतर काढलेला गाळ हा पुढील २४ ते ४८ तासांत उचलणे बंधनकारक आहे. मात्र फक्त याच परिसरात नाही तर संपूर्ण शहरात या नियामाला हरताळ फासला जातो. तो गाळ अनेक दिवस तसाच रस्त्याकडेला पडून असतो. दरम्यान, अंधेरी परिसरातील हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, तो रेल्वे स्थानकाकडे जाणारा आहे. त्यामुळे येथे पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या वेळी येथील जवळील उद्यानात फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व लहान मुल येत असतात. त्यांना येथून चालताना त्रास होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे डासांची उत्पत्तीही वाढली आहे. कारण पालिकेने गटारातील गाळ काढल्यानंतर तेथे फवारणी केलेली नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी डासांचा त्रास येथील जवळपासच्या परिसरात होऊ लागला आहे, असे स्थानिकांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पश्चिम अत्यंत गर्दीचे ठिकाण आहे. येथील एसव्ही रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अशात या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांना चालणे अशक्य होत असून, एखाद्या अपघाताची भीतीही स्थानिक नागरिकांसह दुकानदारांनी केली आहे. प्रशासनाने हा गाळ तातडीने हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com