टिटवाळा-खडवली दरम्यान नवीन गुरवली स्थानकाची

टिटवाळा-खडवली दरम्यान नवीन गुरवली स्थानकाची
Published on

टिटवाळा-खडवली दरम्यान नवीन गुरवली स्थानकाची मागणी
ठाणे, ता. २५ : टिटवाळा ते खडवली दरम्यान नवीन गुरवली रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष विलास वाडेकर यांना निवेदन दिले आहे.
गेल्या ६० वर्षांपासून गुरवली स्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. या स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थ तयार असल्याचेही निवेदनात स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सोयी आणि परिसराच्या विकासासाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगत या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे टिटवाळा-खडवली परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com