पाणी संवर्धनाचा देवघरमध्ये प्रकल्प

पाणी संवर्धनाचा देवघरमध्ये प्रकल्प
Published on

पाणी संवर्धनाचा देवघरमध्ये प्रकल्प
वाडा (बातमीदार)ः तालुक्यातील वैतरणा खोऱ्यात जागतिक जलदिनाच्या निमित्ताने देवघर येथे लघू बंधाऱ्याचे उद्घाटन खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांसोबत पीक नियोजन, पाणी बचतीच्या पद्धतीवर सातत्याने संवाद ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमांतर्गत वैतरणा खोऱ्यात तसेच वाडा परिसरात १५ चेक डॅम्सची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे अंदाजे ३० लाख किलोलीटर पाणी पुनर्भरण आणि साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या उपक्रमांचा उद्देश भूजल पुनर्भरण वाढवणे, पाण्याची उपलब्धता सुधारणे, शेतीला सहाय्य करणे तसेच हंगामी पाणीटंचाई कमी करणे आहे. पालघर जिल्हा बेसॉल्ट खडकांच्या रचनेमुळे भूजल साठवणुकीसाठी आव्हानात्मक आहे. या उपक्रमामुळे एकापेक्षा अधिक पीक चक्र शक्य होणे, शेती उत्पादनक्षमता वाढणे आणि ग्रामीण उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com